ACSW Gadchiroli | सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण (ACSW), गडचिरोली च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

Auto-Scrolling + Draggable Links

ACSW Gadchiroli
बद्दल थोडक्यात माहिती

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. विशेषतः अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय व इतर सर्व घटकांसाठी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याकरिता तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जातात. सामाजिक न्याय विभाग हा गरिब, शोषित व संकटग्रस्त व्यक्तींना या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध आहे आणि सामाजिक कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी या योजनांची तातडीने व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सदैव अग्रस्थानी असतात.

महाराष्ट्र शासनाच्या समाज न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत, मागासवर्गीय समाज—विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गाच्या—सर्वांगीण विकासासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचे उद्दिष्ट या समाजघटकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्याचे आहे. समाजकल्याण विभागातील समर्पित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना गरजू, पीडित आणि वंचित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची आणि त्यांची तात्काळ अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची जबाबदारी समाज न्याय विभागावर आहे.

या कार्यालयामार्फत मागासवर्गीय मुलामुलींसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात, जसे की शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळा, सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी निवासी शाळा, भारत सरकार शिष्यवृत्ती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व परीक्षा शुल्क परतावा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, सैनिक शाळांतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना, अत्याचारग्रस्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कुटुंबांना आर्थिक सहाय्य, कन्यादान योजना (विवाहासाठी आर्थिक सहाय्य), पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सक्षमीकरण आणि स्वाभिमान योजना, अनुसूचित जातीच्या सहकारी सूतगिरण्यांसाठी दीर्घकालीन कर्ज योजना, अनुसूचित जातींच्या सहकारी औद्योगिक संस्थांना आर्थिक सहाय्य, लहान विक्रेत्यांना टिन स्टॉल्सची उपलब्धता, अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या स्वयं सहाय्यता गटांना मिनी ट्रॅक्टर व उपकरणांचा पुरवठा, वृद्धाश्रम योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य धोरण, आणि अनुसूचित जाती उपयोजना. हे सर्व योजनांचे प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी समाज न्याय विभाग कटीबद्ध आहे.

प्रमुख व्यक्ती

आमच्या विविध योजना

केंद्रीय आश्रम शाळा

स्वाधार योजना

शासकीय वसतिगृहे

शासकीय निवासी शाळा

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार

परदेशी शिष्यवृत्ती

विद्यावेतन योजना

विशेष माहिती फलक

  • कंस्लटिंग इंजिनिअर विशेष मानधनवर नियुक्ती करणेकरीता जाहिरात. New
  • स्थागुशा गडचिरोली (पोस्टे चामोर्शी) अप क्र. २२१,२१८/२०२१. New
  • नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश. New
  • आत्मसमर्पित नक्षल सदस्यांचे आरोग्य शिबीर संपन्न. New
  • चार जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; शासनाने एकूण २२ लाख रु. चे बक्षीस जाहीर केले होते. New
  • गडचिरोली पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ८ पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती. New
  • स्वातंत्र्यानंतर प्रथमच महिला दिन साजरा. New
  • ९५ आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना जोईनिंग लेटर प्रदान करण्यात आले. New
  • गडचिरोली पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आत्म समर्पित नक्षल युवक-युवती करिता घरकुल वाटप. New
  • १५० बेरोजगार युवक-युवतींना ऑटोमोबाईल व हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षणशिक्षण. New
  • सरकारी इमारतींचे दुरुस्ती कामासाठी निविदा. New
  • वाहन पुरवठा सेवेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. New
  • बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन सेवेसाठी निविदा. New
  • अन्न व पाणी पुरवठा करार निविदा सूचना. New
  • ऑफिस फर्निचर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया. New
  • इलेक्ट्रिक देखभाल करिता ठेकेदार मागविण्यात येत आहेत. New
  • संगणक व प्रिंटर दुरुस्ती सेवेसाठी निविदा. New
  • सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निविदा नोटीस. New
  • हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडसाठी निविदा. New
  • वाहतूक सेवा करिता खाजगी भागीदारी प्रस्ताव. New
  • नवीन प्रकल्पांचा शुभारंभ. New
  • पोलीस दलात आधुनिक साधनांची वाढ. New
  • महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित. New
  • आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना. New
  • तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार. New
  • नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन. New
  • आरोग्य तपासणी शिबीर आयोजित. New
  • सामाजिक उपक्रमांसाठी निधी जाहीर. New
  • दहावी/बारावी मार्गदर्शन सत्र. New
  • गडचिरोलीमध्ये डिजिटल साक्षरता मोहीम. New
  • वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती. New
  • आरोग्य सहाय्यक पदे रिक्त. New
  • प्रशासकीय सहाय्यक भरती जाहिरात. New
  • आशा स्वयंसेविकांच्या नवीन भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. New
  • ड्रायव्हर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू. New
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर करिता अर्ज. New
  • तांत्रिक सहाय्यक भरती. New
  • लेखापाल पदासाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध. New
  • युवकांसाठी स्टायपेंड आधारित प्रशिक्षण. New
  • आरोग्य तपासणी करिता पॅरामेडिकल स्टाफची गरज. New

माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२५

समाज कल्याण कार्यालय, गडचिरोली अंतर्गत शासकीय निवासी शाळा वांगेपल्ली व सिरोंचा येथील माध्यमिक शालांत परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

विविध कार्यक्रम

आमच्या सुविधा

शासकीय निवासी शाळा

शासकीय निवासी शाळा

अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध मुला-मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही अशा मुला मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा विभागामार्फत चालविली जाते.

शासकीय वसतिगृह

शासकीय वसतिगृह

मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मुलींना विद्यालय व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय वसतिगृहे विभागामार्फत चालवले जातात.

आपला स्नेहीतुडू